तुळजापूर ,दि.२०: 
खते,बियाणे याबाबतच्या सावळ्या गोंधप्रकरणी विविध मागण्याचे निवेदन तुळजापूर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी व्हाईस चेअरमन बाळासाहेब भोसले यानी कृषी अधिकारी यांना दिले आहे.

भोसले यांनी दिलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की, गेल्या वर्षी तुळजापूर तालुक्यात अडीच हजार शेतकऱ्यांची सोयाबीन बियाणे उगवले नाही.  त्यांच्या तक्रारी आपल्याकडे करण्यात आल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पंचनामे देखील झालेले आहेत.


 परंतु आजतागायत या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर झाला असून शेतात सर्व प्रकारची मशागती कामे सध्या सुरू झाली असून शेतकरी  खते व बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी दुकानात जात आहेत.

 पण दुकानदार शेतकऱ्यांना खत बियाणे शिल्लक नाहीत. भाव वाढ झाली आहे, असे सांगत आहेत .आपण प्रत्येक दुकानात कृषी सेवक नियुक्त करावे.
 
 त्याचबरोबर दुकानाच्या दर्शनी बाजूस दुकानातील शिल्लक खत साठा व खताचा  ,बी 'बियाणे यांचे भाव फलक लावण्यात यावे, जेणेकरून शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक होणार नाही.

 निवेदनावर तुळजापुर तालुका खरेदी विक्री संघ  माजी व्हाईस चेअरमन बाळासाहेब भोसले यांची स्वाक्षरी आहे
 
Top