इटकळ , दि. ६ : केशव गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे वय (३८) यांचे  रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

सोमनाथ कांबळे हे लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णु कसबे व शंकर तडाखे यांच्या नेतृत्वाखाली लहुजी शक्ती सेनेची मुहुर्तमेढ उस्मानाबाद जिल्ह्यात रोवली, विखुरलेल्या मातंग समाजाला एकत्र करून त्यांना संघटित करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी काम केले आहे, गाव तिथे लहुजी शक्ती सेनेची शाखा काढुन युवकांना रोजगार निर्मिती व मातंग समाजातील लोकांच्या स्वावलंबनासाठी त्यांनी प्रयत्न केले आहे.


ते उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष, मराठवाडा प्रमुख आणि शेवटी महाराष्ट्र पातळीवर प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले आहे,


महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांचे लक्षवेधी कार्य होते, संपूर्ण महाराष्ट्रात युवकांची मोठी फळी त्यांनी निर्माण केली होती, मोर्चे,मेळावे,धरणे, रास्तारोको अशा आंदोलनातुन मातंग समाजातील शेवटच्या घटकांना शासकीय योजना मिळवुन देऊन त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला आहे.


मातंग समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे यासाठी गेल्या विस वर्षांपासून लढा उभा केला होता त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे व सखोल अभ्यासामुळे दिवंगत माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी सोमनाथ कांबळे यांना विधानपरिषदेवर घेण्याचे निश्चित केले होते,पण दुर्दैवाने त्यांचाच मृत्यू झाला, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळावर अध्यक्ष म्हणून त्यांची वर्णी लागणार होती,पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तो विषय अपुर्णच राहीला.


काटगाव ता तुळजापूर येथे त्यांची पत्नी नगीना कांबळे या सरपंच असुन गावात खुप चांगल्या पद्धतीने काम केले आहे,जिल्हात सर्वात जास्त रमाई घरकुल घेणारे गाव म्हणुन त्यांची गणना व सन्मान झाला आहे.
दि.५ रोजी सकाळी काटगाव ता. तुळजापूर  येथील स्मशानभूमीत त्यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांचे ४ मे रोजी रात्री निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे,एका आठवड्यात सख्ख्या दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला.त्यांच्या पश्चात आई,पत्नी, व दोन मुले असा परीवार आहे. सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे
 
Top