नळदुर्ग,दि.६:
बुधवारी दुपारी अचानक मेघ गर्जना , वादळी वा-यासह पाऊस झाला. काटगाव ता.तुळजापूर शिवारात शेळ्यासह मुलगा झाडाखाली थांबला असता वीज पडून शेळ्या राखणाऱ्या एका १० वर्षीय बालकासह २६ शेळ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना बुधवार रोजी दुपारी ४ वाजता घडली.
तुळजापूर तालुक्यातील काटगाव शिवारात धर्मेंद्र मशाप्पा कोळी वय १० वर्ष हा काटगाव येथील गट नंबर ४४२ मध्ये शेळ्या चारत होता. अचानक आलेल्या अवकाळी पावसात झाडाखाली शेळ्या घेऊन तो थांबला. तेव्हा अचानक वीज पडून धर्मेंद्र कोळी व त्याच्या २६ शेळ्या जागीच मृत्यू मुखी पडल्या.या घटना समजताच काटगाव व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.