खानापूर,दि.५: बालाजी गायकवाड
लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ रामा कांबळे
( वय 38) यांचे दि.4 रोजी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना निधन झाले.
तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील सामाजिक कार्यकर्ते लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे हे काही दिवसांपासून आजरी होते.त्यांच्यावर सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार चालु होते. माञ उपचारा दरम्यान दि.4 रोजी संध्याकाळच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुले,एक भावजय,दोन पुतणे असा परिवार आहे.काटगावच्या विद्यमान सरपंच नगिना सोमनाथ कांबळे यांचे ते पती होत.गेल्या चार दिवसापूर्वी त्यांचे सख्खे भाऊ नवनाथ रामा कांबळे यांचेही अल्प आजाराने निधन झाले आहे.
एकाच आठवड्यात घरातील दोन कर्ते पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आपल्या सामाजिक कार्याची सुरवात त्यांनी सन 2004 पासून लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून केली होती.उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष, मराठवाडा प्रमुख ते सध्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावर ते कार्यरत होते.
मातंग समाजाला न्याय देणे, अन्ययाच्या विरुद्ध आक्रमक लढा देऊन गरीब आणि असंघटित ,बहुजन समाजाला लढा देण्यासाठी ते सतत धैर्याने लढत होते.प्रस्थापितांना धडकी भरेल असेल नेतृत्व आगेकूच करत होते.मातंग समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी तहसील कार्यालय ते मंत्रालयापर्यंत अनेक आंदोलने केली आहेत.आपल्या दिलदार स्वभावामुळे ते एक कुशल संघटक होते.
त्यांच्या पार्थिवार काटगाव येथे अंत्यसंकार करण्यात आले.
त्यांच्या निधनाने गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.