उस्मानाबाद, दि.५
 जिल्हयातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड व औरंगाबाद विभागीय कार्यालयातील उपायुक्त (विकास)  अविनाश  गोटे यांनी जिल्हा रुग्णालयातील ऑक्सीजन प्लांटला भेट देऊन पाहणी केली.


  माझे कुटुंब माझी जबाबदारी निमित्त डॉ.फड व उपायुक्त (विकास) अविनाश  गोटे यांनी ग्रा.पं.वडगांव (सि.)  ता.उस्मानाबाद येथे भेट देवुन  सुरु असलेल्या सर्वेक्षणाची पाहणी केली.  कोरोना विषाणुचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे व नियमित हात धुणे  या ञिसुञी नियमांचे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी पालन करणे आवश्यक आहे,असे ते म्हणाले. 

त्यानंतर तेरणा पब्लिक स्कुल येथील कोवीड केअर सेंटरला भेट देवुन रुग्णांशी संवाद साधला.यावेळी त्यांचे समवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) संजय तूबाकले,जिल्हा आरोग्य अधिकारी हनुमंत वडगावे, गटविकास अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाणे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश तायडे आदी उपस्थित होते.
 
Top