तुळजापूर,दि.५ :
सध्या कोरोनाने थैमान घातलेल असुन सर्वात जास्त प्रादुर्भाव हा आपल्या राज्यात जास्त आहे . यामुळे महाराष्ट्रातील विविध माध्यमाचे प्रतिनिधी प्रत्येक काना कोपर्यात जाऊन जनतेसमोर सत्यता मांडण्याचा प्रयत्न करत आहेत.काही दिवसापूर्वी अनेक प्रतिनिधीना कोरोना या आजारापासून आपला जिव गमवावा लागला आहे.
पत्रकार यांना चौथा स्तंभ म्हणून पाहीलं जात आहे, तरी त्याना अशा परिस्थितीमध्ये जे प्रतिनिधी कोरोना आजारापासून मृत्यु झाले आहे. अशा प्रतिनिधींना त्यांच्या कुटुंबासाठी अपघाती विमा योजना लागू करण्यात यावी. व जसे पश्चिम बंगाल मध्ये पत्रकार याना कोरोना योध्दाचा सन्मान देण्यात आला आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील सर्व पत्रकार यांना कोरोना योध्दा म्हणून सन्मान देऊन त्यांचा गौरव करण्यात यावा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष जुबेर शेख यांनी मुख्यमंञी यांच्याकडे केली आहे .