तुळजापूर,दि.५: कुमार नाईकवाडी राज्यासह संपुर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. मराठा समाज बांधवासाठी काळा दिवस म्हणून तुळजापुरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दि. ५ बुधवार रोजी येथील उस्मानाबाद रोडवर काळ्या फिती लावुन मुढन करत राज्यकर्त्याच्या निषेध केला.
राज्य कर्त्यानी बनवलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. यामुळे मराठा समाज बांधवाना मोठा धक्का बसला आहे. मराठ्याना आरक्षण मिळावे यासाठी समाज बांधवाच्या वतीने राज्यात अनेक मोर्चे काढले, अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. पण शेवटी मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकविण्यात केंद्र सरकार व राज्य सरकार यांना अपयश आल्याने मराठा समाज बांधवासाठी काळा दिवस म्हणून तुळजापुरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दि. 5 बुधवार रोजी येथील उस्मानाबाद रोड वर काळ्या फिती लावुन राज्यकर्त्याच्या विरोधात घोषणाबाजी करत मुढंन करुन निषेध करण्यात आला.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सज्जनराव सांळुके, अजय सांळुके, जिवन इंगळे,महेश गवळी, धैर्यशील कापसे, कुमार टोले,आण्णासाहेब क्षिरसागर, प्रतिक रोचकरी ,अर्जुन सांळुके, किशोर पवार , प्रशांत इंगळे, अशोक फडतरी आदीची उपस्थिती होती.