मुरूम, दि.५ :
नगरसेवक अजित चौधरी यांच्या वतीने शहरातील नागरिकांना मोफत सॅनिटायझर व एन ९५ मास्कचे वाटप बुधवारी रोजी करण्यात आले.
शहरातील मुख्य बाजारपेठेतील बसवेश्वर चौकात नगरसेवक अजित चौधरी यांच्या वतीने मोफत एन ९५ मास्क व सॅनिटायझरचे भाजीपाला व्यवसायीक व नागरिकांना वाटप करण्यात आले. चौधरी यांच्या हस्ते शहरातील गरीब नागरिकांना एक हजार सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी जगदीश निंबरगे, बसवराज कलशेट्टी, संजय आळंगे, राम पाटील, अरिफ कुरेशी आदिंची उपस्थिती होती. कोरोना संकटाच्या काळात जिवाची पर्वा न करता, रूग्णाची काळजी घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी रूग्णांना मानसिक आधार देऊन कोरोनाविरुद्ध लढण्याचे बळ दिल्याबद्ल त्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून कोरोनामुक्त झालेल्या एका युवकाची कोविड सेंटर मध्ये जावून भेट घेतली. व आरोग्य कर्मचाऱ्यांचा त्यांनी सत्कार करून सेंटरमधील कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर भेट दिले.
विशाल मोहीते, नाना टेकाळे, मोहन जाधव, जयसिंह खंडागळे, उमेश कारडामे, अनिकेत टेकाळे, अतिश चौधरी, राघवेंद्र चौधरी, दत्ता चौधरी, अजित बिराजदार सह युवासेना व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.