तुळजापुर, दि. ४:
श्री .तुळजाभवानी मंदिर संस्थांकडून ऑक्सीजन प्रकल्प उभा करण्याचे काम तातडीने सुरू करण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी डॉ. कौस्तुभ दिवेगावकर यांना आदेश दिले आहेत.
तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय आणि तालुक्यातील कोविड -19 साठी दोन अत्यंत महत्त्वाच्या मागण्या राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केल्या आणि आरोग्य मंत्री टोपे यांनी तुळजाभवानी मंदिर संस्थांकडून मंजूर करण्यात आलेला ऑक्सीजन प्रकल्प लवकरात लवकर चालू होण्यासाठी निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्याचे सूचना केले आहेत.
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय येथे ११९ रुग्ण असून त्यांना दररोज पन्नास रेमडिसीवर इंजेक्शनची आवश्यकता आहे.सध्या केवळ १० ते १२ इंजेक्शन मिळतात. ही इंजेक्शन ची संख्या वाढवून देण्यासंदर्भात आरोग्य मंत्री टोपे यांनी एफ डी ए कमिशनर यांना इंजेक्शन वाढवून देण्यासंदर्भात आदेशित केले आहे.
या आपत्तीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी गेल्या दोन महिन्यापासून राज्याचे आरोग्य मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेश टोपे यांच्याकडे जातीने पत्रव्यवहार केल्यामुळे महत्वाचे प्रश्न निकाली निघाले आहेत आणि त्याचा उपयोग तालुक्यातील रुग्ण आणि नागरिकांना होत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका युवक अध्यक्ष संदीप गंगणे म्हणाले की , तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील यांचे मंत्रीमहोदयासोबत अत्यंत निकटचे संबंध असल्यामुळे त्याचा उपयोग उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील महत्त्वाच्या प्रश्नासाठी झाल्या आहे या काळात आरोग्यमंत्री टोपे यांनी केलेली मदत खूप मोलाची आहे असे सांगितले.