नळदुर्ग,दि. ५, : कोरोनाच्या महामारीत मनुष्यहानी झालेल्या कुटुंबास व गेली महिनाभरापासून पूर्णपणे व्यवसाय बंद असलेल्या गावातील हेअर सलून धारकांना साहेबराव घुगे मित्र मंडळाच्या वतीने १५ किराणा साहित्य कीट वितरित करण्यात आले.
कोरोनाने मोठा हाहाकार उडवला असून गतवर्षीच्या तुलनेत यावेळी मनुष्यहानी होताना दिसून येत आहे. तर रोजगारावर तर मोठी संक्रात आली आहे.
कोरोनाने घरातील कर्ता माणूस गेला की कुटुंबावर मोठे संकट कोसळत आहे. अशा कुटुंबीयांना एक सामाजिक बांधीलकी म्हणून,मयत कुटुंबीयांना व हेअर सलून व्यवसायिकांना साहेबराव घुगे मित्र मंडळाकडून जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले.
गतवर्षी कोरोना काळात केशव वाचनालय अणदुर व साहेबराव घुगे मित्र मंडळाच्या वतीने *१२२ दिवस* गावातील गरजू मंडळींना *घरपोच जेवण अभियान सह गावामध्ये अन्नधान्य किट,मास्क डेटॉल साबण, सॅनिटायझर वाटप, जनजागृती पत्रक फलक,आदी बाबीवर १८ मार्च २०२० ते ३१ जुलै पर्यंत मंडळाने हे उपक्रम राबलले होते.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे, गुंडेशा गोवे, अनिल अणदुरकर, म्हाळाप्पा घोडके, शाहूराज मोकाशे, राहुल राठोड, सोमनाथ लंगडे , काशीनाथ घुगे हे उपस्थित होते.