अणदूर,दि.२०
येथील युवासेनेचे कार्यकर्ते छोटू घुगे व भरत घोडके यांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून कार्यकर्त्यांनी, महामार्गावरील ट्रक चालक, क्लिनर यांना शिरा वाटप केले. नळदुर्ग येथिल कोविड सेंटरमधील रुग्णाना अंडी व शिऱ्याचे वाटप केले. त्याबद्दल या शिवसैनिकांचे कौतुक होत आहे.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील शिवसैनिक छोटू घुगे व भरत घोडके यांचा वाढदिवसाचा सर्व खर्च त्यांनी 20 किलो शिरा तयार करून सकाळी महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक ट्रक ड्रायव्हर व क्लिनर यास एक प्लेट शिरा पार्सल देऊन व कोविड सेंटरला अंडी व शिरा दिला .यासाठी युवा सेनेचे बिलाल खानापुरे, राजेश पाटील, विशाल गुड्डू, आकाश साळुंके, प्रबुद्ध स्वामी, प्रशांत मुळे, सोमनाथ बेदरे, मोहम्मद शेख,बाबा कुरेशी आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले,
जेष्ठ पत्रकार चंद्रकांत हगलगुंडे यांच्या हस्ते कोविड सेंटर ला 70 रुग्णासाठी अंडी व शिरा देण्यात आला,या वेळी कोविड सेंटरचे डॉ नारायण घुगे, कविता राठोड, जगताप उपस्थित होते.