नळदुर्ग,दि.२० :
शहरातील रुग्णाच्या सोयीसाठी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने नळदुर्ग शहरात ज्यादा लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी संबधिताकडे करण्यात आली आहे.
नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सद्या लसीकरण सुरू आहे, परंतु शहरातील वसंत नगर,वडारवाडा, इंदिरा नगर, ठाकरे नगर,व्यंकटेश नगर, वैष्णव नगर,रामलीला नगर,रहीम नगर,व्यास नगर,भवानी नगर,या भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जाण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने, प्राथमिक आरोग्य केंद्र हे त्यांच्या राहत्या ठिकाणा पासून बरेच अंतरावर असल्याने,तसेच शहराची लोकसंख्या 30-३५ हजाराच्या जवळपास आहे,
त्यामुळे शहरातील वरील भागातील नागरिकांच्या सोयीसाठी ज्यादा लसीकरण केंद्र सुरू करावे,व तसेच शहरासाठी पुरेशी लस उपलब्ध करून शंभर टक्के लसीकरण करण्यावर भर द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे,
निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतीबा येडगे, शहराध्यक्ष अलिम शेख, शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांच्या स्वाक्षरी आहेत.