मुरूम, दि.२० : येथील नेहरू नगर भागात राहणारे हॉटेल व्यवसायिक कै.भीमाशंकर शरणप्पा कलशेट्टी यांचे बुधवारी दि.१९ रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते.
त्यांच्यावरती सार्वजनिक स्मशानभूमित गुरुवारी दि.२० रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. संत निरंकारी मंडळाचे मुखी दयानंद साखरे यांचे ते सासरे होत.