उस्मानाबाद, दि.20
जिल्ह्यात  शुक्रवार दि. 21 मे रोजी 45 वर्षाच्या वरील नागरिकांना मिळणार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस.


उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दि. 21 मे 2021 रोजी 45 वर्षाच्या वरील नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. याकरिता जिल्ह्यामध्ये दि. 21 मे 2021 रोजी 36 निवडक आरोग्य उपकेंद्र, 1 नागरी प्राथमिक अरोग्य केंद्र, 6 ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद आणि पोलीस रुग्णालय उस्मानाबाद या ठिकाणी लसीकरण सत्र आयोजित केले  आहेत.



लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड सोबत बाळगावे. या दिवशी केवळ 45 वर्षावरील नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचारी फ्रन्टलाइन वर्कर यांन केवळ कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यानी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करु नये.

लसीकरण वेळ सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. जिल्ह्यामध्ये दि. 21 मे 2021 रोजी एकूण 49 लसीकरण केंद्र कार्यान्वित असणार आहेत. 
लाभार्थ्यांना लस घेण्याकरिता ऑनलाईन नोंदणी अथवा बुकिंग करण्याची आवश्यकता नाही. लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित लाभार्थ्यापैकी प्रथम आलेल्या लाभार्थ्याना ऑन स्पॉट नोंदणी पध्दतीने क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. 

लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत आणि नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रीत करुन आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांना गर्दी न करता कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत ,शांततेत  लस घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.


लसीकरण केंद्र ठिकाण
आरोग्य उपकेंद्र 36 (ग्रामिण भाग तालुकानिहाय) 
उस्मानाबाद – खमगाव, शिंगोली, कामेगाव, दारफळ, बामणी, चिलवडी, घाटंग्री.
तुळजापूर – खुदावाडी, माळुंब्रा, मसला खुर्द, खडकी, तिर्थ खुर्द, देवसिंगा तू.
उमरगा – मळगी, डाळिंब, जकेकुर, एकुर्गा.
लोहारा – भातांगळी, हिप्पर्गा  रवा, धानोरी, तोरंबा.
कळंब – पिंपरी ‍(शि), जायफळ, गौरगाव, देवळाली, वाकडी, हासेगाव.
वाशी – गोजवाडा, कडकनाथवाडी, घाटपिंपरी.
भूम – दुधाडी, ईडा.
परांडा – चिंचपुर बुद्रुक, इंगोंदा, कुकडगाव, पिस्तमवाडी, 
 त्याचबरोबर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, वैराग रोड उस्मानाबाद,पोलीस रुग्णालय उस्मानाबाद (केवळ फ्रन्टलाइन वर्कर करिता), शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद,जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद, मुरुम,लोहारा,सास्तुर,तेर,वाशी,भूम इत्यादी ग्रामीण रुग्णालय, तर   तुळजापूर,कळंब,परंडा येथिल उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार आहे.
 
Top