इटकळ, दि. 20 :
तुळजापूर तालुक्यातील टेलरनगर येथील अंगणवाडी ताई श्रीमती ज्योती राजाराम क्षीरसागर वय 34 वर्षे यांचे गुरूवार दि. 20 मे रोजी अल्पशा अजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सासु - सासरे , दीर - भावजाई असा परिवार आहे.
सन 2008 मध्ये श्रीमती ज्योती यांचे पती राजाराम क्षीरसागर यांचे निधन झाल्याचे पोलिस पाटील विजय वाघमारे यांनी सांगितले. पती पाठोपाठ पत्नी ज्योती यांचे निधन झाल्याने क्षीरसागर कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला असून मुलांवरील मात्या पित्याचे छात्र हरवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.