तुळजापूर, दि. 20 डॉ. सतीश महामुनी
तुळजापूर नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असताना दुकान उघडून व्यवसाय करण्याचा प्रयत्न करणा-या तिघा दुकानदारावर न. प च्या पथकाने कारवाई केली आहे.
संचारबंदी काळात गुरूवार दि. २० मे रोजी नगरपरिषद हद्दीमधील ३ दुकाने चालू ठेवून व्यवसाय करताना निदर्शनास आल्याने ही दुकाने सील करण्यात आली. शहरातील सन सिरामिक व जिजाऊ ग्लास सेन्टर आणि भवानी रोड तुळजापूर येथील आष्टगे कापड दुकान अशा तीन दुकानावर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत कार्यालय अधीक्षक व्ही.व्ही. पाठक यांचे नेतृत्त्वाखाली पथक प्रमुख सज्जन गायकवाड, ज्ञानेश्वर टिंगरे, संतोष इंगळे, खालीद सिद्दिकी, विश्वास मोटे, राजू सातपुते, बापू रोचकरी, नागेश काळे, अण्णा पारधे हे कर्मचाऱी सहभागी झाले.
जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या सुचनांची नगरपरिषद अंमलबजावणी करीत असुन शहरवासीयांनी नियमांचे पालन करून कोरोना निर्मूलनासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी केले आहे.