तुळजापूर ,दि.२० :
बाजार समितीचे सहसचिव कै. कुलदीप पवार यांना बाजार समितीच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी पवार यांचा अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव कुलदीप पवार (३८) यांचे सोमवार (दि. १७) सायंकाळी कोरोना वरील उपचारा दरम्यान मृत्यु झाले होते.
कै. पवार यांच्या अकाली निधना बदल बाजार समितीच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. बाजार समिती सभागृहात आयोजित शोक सभेला सभापती विजय गंगणे, जेष्ठ संचालक उत्तम लोमटे, बालाजी रोचकरी, सचिव उमेश भोपळे यांच्यासह बाजार समितीतील व्यावसायिक, कर्मचारी व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.