तुळजापूर, दि. 20
शेतात वापरण्यात येणा-या खतांची भाव वाढ केल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे. त्याचबरोबर कडधान्य आयातीस विरोध करण्यासाठी प्रहार संघटनेच्यावतीने निषेध करण्यात आले आहे.
तुळजापूर येथे प्रहार क्रांती आंदोलन संघटनेच्यावतीने नायब तहसीलदार शिंदे यांना खतांची भाव वाढ व कडधान्य आयात विरोध करण्यासाठी प्रहार संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या फायद्याचे धोरण सरकारने राबवले पाहिजे अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सरकार दिरंगाई करते, ही बाब प्रहार संघटनेच्या वतीने सदर निवेदनामध्ये नोंदवलीआहे.
यावेळी प्रहार क्रांती आंदोलन संघटनेचे तालुकाध्यक्ष शशिकांत मुळे तसेच शहराध्यक्ष नागेश कुलकर्णी ,कमलाकर डीगे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.