तुळजापूर, दि. १९ :
जिजामाता प्रतिष्ठान अध्यक्ष मधुकर शेळके यांची मुलगी कु. श्रध्दा शेळके हिच्या वाढदिवसा निमित्त तुळजापुर पोलिस निरिक्षक राठोड यांच्या हस्ते ५१ गरिब निराधार कुंठुबाना किराणा साहित्य किट वाटप करण्यात आले.
यावेळी सौ. गायत्री मधुकर शेळके, आबासाहेब कापसे, प्रशांत अपराध, बाळासाहेब चिकलकर, किरन यादव, महेश सिरसट यांची उपस्थिती होती.
मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात येणारा खर्च टाळून आम्ही कुटुंबीयांनी या आपत्तीच्या काळात गरजू लोकांना किरणा साहित्याची मदत करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार पोलीस निरीक्षक राठोड यांच्या हस्ते साहित्याचे वितरण केल्याची माहिती मधुकर शेळके यांनी दिली.