काटी,दि.२७ : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव गाव सध्या तरी कोरोनामुक्तीकडे वाटचाल चालू असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 27 जण पॉझिटिव्ह आले होते. सध्या कोरोनाचे तीन पेशंट ॲक्टीव रुग्ण असून सध्या ते होम आयसोलेशन मध्ये राहून उपचार घेत आहेत. तसेच दुसऱ्या लाटेत येथील एकही रुग्ण दगावले नसल्याची माहिती सरपंच रामेश्वर तोडकरी यांनी दिली.
सध्या सावरगावची वाटचाल कोरोना मुक्तीकडे असल्याचे चित्र आज पाहावयास मिळत असून भविष्यात सावरगाव मध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी व ही साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून येथील आरोग्य विभागासह जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, सरपंच रामेश्वर तोडकरी, उपसरपंच आनंद बोबडे आदी स्थानिक पुढाऱ्यानी पुढाकार घेऊन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 50 व्यापाऱ्यांचे अॅन्टीजेन टेस्टमध्ये स्वॅब तपासण्यात आले. या टेस्टमध्ये सर्व व्यापाऱ्यांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तसेच बुधवार दि.26 ते रविवार दि.30 असा पाच दिवसांचा जनता कर्फ्यु पुकारण्यात आला.
यासाठी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, सरपंच रामेश्वर तोडकरी, उपसरपंच आनंद बोबडे, वैद्यकीय अधिकारी माशाळकर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व्ही.एच. साळुंके,आरोग्य सहाय्यक साळवे,महादेव भालेकर,संदीप जगताप यांनी परिश्रम घेतले.