उस्मानाबाद, दि. 27 : जिल्हयात बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णाची संख्या वाढत आहे.
उस्मानाबाद जिल्हयात आज गुरूवार दि. 27 मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 356 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 8 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 543 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 53 हजार 846 इतकी झाली आहे. यातील 48 हजार 728 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 हजार 209 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 3 हजार 909 जणांवर उपचार सुरु आहेत.
दिलासादायक बुधवारचे अहवाल
जिल्ह्यात बुधवारी मोठा दिलासा मिळाला. ४ एप्रिलनंतर सर्वात कमी ३०६ एवढे नवीन रुग्ण बुधवारी आढळले. त्यामुळे कोरोनाची लाट ओसरत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, बुधवारी पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली तर ३४४ जणांना डिस्चार्ज मिळाला.
जिल्ह्यात मार्चपासून कोरेाना रुग्णवाढीचा क्रम वाढत होता. आता उतरण सुरू झाली आहे. बुधवारच्या अहवालानुसार जिल्ह्यात ३०६ नवे रुग्ण आढळले. दि. ४ एप्रिलला जिल्ह्यात २९२ रुग्ण आढळले होते. त्यानंतर दररोजचा आकडा ४०० पर्यंत होता. रुग्णसंख्या कमी होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे.