उस्मानाबाद,दि.१९ :
संसर्गजन्य कोरोनामुळे अनेक लोक त्यांचे मनोधैर्य खचून बसले आहेत. त्यात रुग्ण व त्यांचे नातेवाईक देखील नैराश्यात असल्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढवून, रुग्णांना ताकदीनिशी या आजाराशी लढा देण्याचा संदेश देत विविध विषयांवर जनजागृती करत विवेकानंद युवा मंडळाद्वारे 'ऑनलाइन मोटिव सेशन' या उपक्रमाद्वारे खूप महत्त्वाचे कार्य सुरू आहे.
दोन आठवडे चालणाऱ्या या उपक्रमामध्ये विविध क्षेत्रांतील तज्ञ मंडळी डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सामाजिक कार्यकर्ते, विविध शासकीय अधिकारी-कर्मचारी हे देखील या 'ऑनलाइन मोटिव सेशन' उपक्रमामध्ये सहभाग नोंदवत आहेत.
यामध्ये विवेकानंद युवा मंडळाचे कार्यकर्ते विविध विषयांवर सेमिनार देत आहेत. युवकांनी चालविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वञ कौतुक होत आहे.
या ऑनलाईन मोटिव सेशन कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी धनंजय काळे यांचे मार्गदर्शन मिळाले. यासाठी विवेकानंद युवा मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण साळुंके, महेंद्रप्रताप जाधव, स्वप्नील देशमुख, सुमित जानराव, क्रांतिसिंह काकडे व आदी युवा कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभत आहे.