उमरगा,दि.१९ :
कोरोना संसर्ग प्रतिबंध आणि त्यावरील उपाय यासंदर्भात स्वयंम शिक्षण प्रयोगद्वारे उस्मानाबाद व लातूर जिल्हातील 40 गावातील 600 कुटुंबाला दि. १८ मे रोजी ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणात कोविड प्रतिबंधक उपायसह शाश्वत शेती आणि शेतीपूरक उत्पादने याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले .या कार्यक्रमात गावस्तरावरील लीडर महिलेचा आढावा घेण्यात आला. उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा व काजला गावातील लीडर महिलांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या कमाचे अनुभव कथन केले.
या दोन्ही गावात सध्या एकही रुग्ण नाही नागरिक मास्क कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्याची दक्षता घेताहेत. तसेच शासकीय आदेशाचे पालन करत असल्याचे सांगितले. स्वयंम शिक्षण प्रयोगाकडून या प्रशिक्षणात बीजप्रक्रिया ,उगवण क्षमता,सेंद्रिय खताचा वापर करणे तसेच शूअरच्या प्रॉडक्टबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. स्वयंम संस्थेच्या प्रोजेक्ट मॅनेजर तब्बसुम मोमीन, जिल्हा व्यवस्थापक बाळासाहेब काळदाते तसेच माधव बोरकट्टे यांनी मार्गदर्शन केले. तालुका समन्वयक शीतल रणखांब, शिल्पा वेलदोडे,सुजाता पाटील,रोहिणी घोडके ,अंजना साबळे, जोत्स्ना माने यांनी काम पाहिले.