तुळजापूर ,दि.१९ :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असुन
राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाहनानुसार दि.
१९ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापुर व शहराध्यक्ष अमर चोपदार , युवक शहराध्यक्ष नितिन रोचकरी यांच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी ५२ दात्यानी रक्तदान केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्य्क्ष गोकुळ शिंदे, दिलीप मगर, बबन गावडे , खंडू अशोक, फड़करी जाधव ,युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके , गोरख पवार ' युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे , युवा नेते महेश चोपदार, युवा नेते आण्णा क्षीरसागर, शहर सचिव अभय माने , कृषि विद्यार्थी मराठवाड़ा उपाध्यक्ष स्वप्निल माने , जनक पाटिल , विक्की घुगे, आप्पा पवार, शरद जगदाळे, अनमोल शिंदे, वैभव शिंदे, मनोज माडजे, गणेश नन्नवरे, संकर्षण देशमुख' चेतन पांडगळे आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.