मुरूम, दि.१४ :
येथील बसवेश्वर युवक मंडळाच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांची ८९० वी जयंती व रमजान ईद निमित्त रक्तदान शिबिर घेवुन सामुदायिक जयंती व ईद साजरी करण्यात आली.
सध्या कोरोना काळात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस सहाय्यक पोलिस निरीक्षक रंगराव जगताप, सिद्धमल्लय्या महाराज चरमूर्ती यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जगदीश निंबरगे, राजकुमार लामजने, उमेश कारडामे, संमेश्वर कारभारी, संतोष स्वामी, धनंजय मुदकण्णा, आनंत पाटील, बालाजी टिकांबरे आदींनी पुढाकार घेऊन शिबिर यशस्वी केले. यावेळी कुंभारी (जि.सोलापूर) येथील अश्विनी रक्तपेढीच्या डॉ.अंबिका कांबळे, नागार्जुन जिंकले, विश्वनाथ हिरापूरे, इरफान शेख, चनविर बिराजदार, रतन तरटे आदिंनी रक्तसंकलनाचे काम केले.
यावेळी ८७ रक्तदात्यांनी रक्तदान केल्याबद्ल प्रत्येक रक्तदात्यास मंडळाकडून वाफेची मशिन भेट देवून सर्व रक्तदात्याचे बसवेश्वर युवक मंडळाच्या वतीने आभार मानले.