लोहारा,दि.१४ : 
लोहारा येथे महात्मा बसवेश्वर महाराज व धर्मवीर संभाजी महाराज,परशुराम आशा तिन्ही महान युगपुरुषच्या जयंती व मुस्लिम समाजाचा पवित्र सण रमजान ईद व अक्षय तृतीय आशा समभाव दिवसाचे औचित्य साधून लोहारा शहरातील मित्र परिवार यांच्या वतीने  गरिब कुटुंबाना किराणा साहित्य  किटचे वाटप करण्यात आले.

शहरात  कोरोना काळात ज्याचा रोजगार गेला, घरकाम करणाऱ्या रोजंदारी करणारे, मोलमजुरी करणारे वंचित, उपेक्षित हातावर पोट भरणारे असे 50  कुटूंबाना जि. प. कें .प्रशाला लोहाराचे निवृत्त  मुख्याध्यापक  दिनकर कुलकर्णी गुरुजी व भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी यांच्या हस्ते किरणांचे किट देऊन मदत केली.


  या कोरोनासारख्या संकट कालीन परिस्थितीमध्ये  माणुसकीचे दर्शन घडविले. आशा कोरोनाच्या संकट कालीन परिस्थिती मध्ये व लॉकडाउन काळात एक मदत नव्हे कर्तव्य समजुन शहरातील मित्र परिवार व  शहरातील सामाजिक जाण असणारे असे मित्र परिवार एकत्र येऊन समाजाविषयी तळमळ दाखवीत शहरातील खऱ्या अर्थाने जे वंचित आहेत असे 50 कुटूंबाना किट वाटप केले.
 या स्तुत्य उपक्रमास  शहरातील रमाकांत गायकवाड, शफिक जमादार ,चंद्रप्रकाश लक्ष्मण, बोडगे विक्रांत' संगशेट्टी  संतोष, वाघमारे नेताजी 'सुभाषचंद्र भोस महाविद्यालयांचे प्राध्यापक उद्धव सोमवंशी,  आदर्श पुरस्कार शिक्षिका  चौधरी ,  दगडू तिगाडे , सुजित माशाळकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. 

कार्यक्रमाच्या वेळी विक्रांत संगशेट्टी, शफिक जमादार सुजित माशालकर अजीम शेख  संतोष फरिदाबादकर, दगडू तिगडे, बाबा हेड्डे, उमर पठाण, संतोष माळवदकर, हे सर्वजण  उपस्थित होते.
 
Top