उमरगा तालुका काँग्रेस कमिटी कडुन महापुरुषांची जयंती जाजरी
आज जगतज्योती, महात्मा बसवेश्वर महाराज,धर्मवीर छत्रपती संभाजी राजे ,भगवान श्री परशुराम यांची जयंती निमित्त आज काँग्रेस भवन उमरगा येथे साजरी करण्यात आली.
यावेळी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, जिल्हा कांग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप भालेराव,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष राजोळे,विजय दळगडे ,विजय वाघमारे ,विक्रम मस्के ,महेश मशालकर ,सोहेल इनामदार ,बाबा मस्के चंदू ,मजगे जीवन सरपे ,टकसाळे , काजले आदि उपस्थित होते.