इटकळ ,दि.१४
इटकळ ता. तुळजापूर येथे नानजी देशमुख कृषीसंजिवनी प्रकल्पांर्गत ई ग्रामसभा शुक्रवार दि.१४ रोजी पार पडली.
शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता इटकळ सरपंच,उपसरपंच,प्रगतीशील शेतकरी,ग्रामपंचायत सदस्य,यांच्या सहकार्याने ई ग्रामसभा घेण्यात आली.
यावेळी नानाजी कृषीसंजिवनी प्रकल्प गावात ग्रामसंजीवनी समीती स्थापन करण्यात आली.कृषीमित्र व कृषीताई निवड करण्यात आली.
विशेषयज्ञअधिकारी (कृषी)सचिन पांचाळ यांनी प्रक्लपाची सविस्तर माहिती दिली.
खरीप हंगाम पुर्व तयारी, तर प्रकल्प तज्ञ (मनुष्य बळ व विकास) रविराज फुगारे यांनी सुक्षम नियोजन, मृगसंधारण यांची माहिती दिली. यासाठी समुहसहाय्यक श्रीकृष्ण मुळे यांनी ई ग्रामसभा घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
यावेळी सरपंच राजश्री बागडे,सचिव बालाजी कदम, कृषी साह्यायक आर के दुधभाते ,फिरोज मुजावर,अरविंद पाटील व ग्रामपंचायत सदस्य उपस्थितीत होते.