तुळजापूर, दि. 21
शहरातील 124 कोवीड सेंटर मधील कोरोना रूग्णांना अल्पोपहार देण्यात आले .
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर समर्थक गुलचंद व्यवहारे मित्र परीवाराचे सागर कदम व सागर पारडे यांच्या वतीने हा अल्पोपहार देण्यात आले .
यामध्ये पोहे, अंडे, मटकी, उपीट तसेच जिलेबी देण्यात आली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष सुहास साळूंखे, तुळजापूर विकास प्राधिकरण सदस्य विकास मलबा, इंद्रजीत साळूंखे, उमेश शेंडगे यांच्या हस्ते अल्पोहार देण्यात आला.