उस्मानाबाद, दि. 21
जिल्हयात सोमवार दि. 24 मे रोजी पासून जनता कर्फ्युमध्ये सुट देण्यात आली असुन सोमवार रोजी पासुन अत्यावश्यक सेवेबरोबरच जीवनावश्यक सेवांना ढील देण्यात आली आहे.
सकाळी 7 ते 11 या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.
यामध्ये फळे, भजीपाला , दुध संकलन व वितरण , किराणा दुकाने, बेकरी मिठाई, चिकन मटन, मासे, अंडी दुकाने यासह पेट्रोल पंप यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश आहे.
तसेच सर्व बँका, पोस्ट ऑफिस, कृषी दुकाने दुपारी 2 पर्यंत सुरू राहणार आहेत. आठवडयातील प्रत्येक शनिवार व रविवार जनता कर्फ्यु लागू राहणार आहे.