नळदुर्ग ,दि.२९: विलास येडगे
दि.३१ मे रोजी नळदुर्ग येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३९७ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे यावर्षीही जयंती अतीशय साधेपणाने साजरी करण्यात येणार आहे.
जयंतीचे औचित्य साधुन राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीने येत्या वर्षभरात ३९७ वृक्ष लावण्याचा संकल्प केला असुन या वृक्ष लागवडीचा शुभारंभ दि.३१ मे रोजी करण्यात येणार असल्याचे समितीचे पद्माकर घोडके यांनी म्हटले आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३९७ वी जयंती संपुर्ण राज्यात साजरी होणार आहे. मात्र सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे अहिल्यादेवी यांची जयंती साधेपणाने समाजपयोगी कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात येणार आहे. नळदुर्ग येथे दि.३१ मे रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने साजरी करण्यात येणार आहे.
नळदुर्ग शहरात अहिल्यादेवी यांची जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. मात्र कोरोनामुळे गेल्यावर्षी पासुन जयंती साधेपणाने साजरी केली जात आहे. यावर्षीही जयंती साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. यावेळी सध्याची गरज लक्षात घेऊन समितीने वृक्ष लागवड करून त्यांचे जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मोठ्याप्रमाणात वृक्षतोड झाल्याने सध्याच्या महामारीच्या काळात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासली आहे. अनेकांना ऑक्सिजन मिळाले नाही म्हणुन त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या निर्माण झालेला ऑक्सिजनचा तुटवडा भरुन काढण्यासाठी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीने वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीने गेल्या तीन वर्षात अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त वृक्ष लागवड केलेल्या ५० वृक्षांचे अतीशय चांगल्या प्रकारे जतन केले आहे. समितीने वृक्ष लागवड करून जतन केलेल्या वृक्षांमुळे नगरपालिका रस्ता हिरवळीने फुलुन गेला आहे. यावर्षीही समितीने या वर्षभरात ३९७ वृक्ष लाऊन त्यांचे जतन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या वृक्ष लागवडीचा शुभारंभ दि.३१ मे रोजी करण्यात येणार आहे. याच दिवशी तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त वृक्ष लागवड करून त्याचे जतन करण्याचा संकल्प करावा असे आवाहन समितीचे पद्माकर घोडके यांनी केले आहे.
वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी समितीचे पद्माकर घोडके, प्रभाकर घोडके, सुहास येडगे, अमर भाळे,विलास येडगे, मारुती घोडके, दयानंद चौरे, रमेश घोडके, दीपक घोडके यांच्यासह समितीचे सर्व कार्यकर्ते परीश्रम घेत आहेत.