नळदुर्ग,दि.२९ : 
येथिल आपलं घर प्रकल्पातील अनाथ मुला - मुलीसाठी एक महिना पुरेल एवढे जिवन आवश्यक साहित्य शिवसेनेचे उमरगा - लोहारा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यावतीने  शुक्रवार रोजी देण्यात आले.


 राष्ट्र  सेवा दल संचलित, 'आपलं घर' प्रकल्पातील  बालगृह, नळदुर्ग येथे उस्मानाबाद जिल्ह्यातील व परिसरातील अनेक अनाथ बालकांचे कोरोनाच्या संकट काळातही संगोपन  केले जात आहे. सध्या कोरोनामुळे व इतर काही तांत्रिक बाबींमुळे सदर संस्थेस शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानास विलंब होत आहे. 

परिणामी सदर बालकांच्या संगोपनात अनेक गैरसोयी निर्माण होत आहेत. ही बाब ओळखुन या संस्थेस भेट देऊन शिवसेनेच्या वतीने येथील एक महिन्यासाठी लागणारे रेशन, इतर साहित्य व मास्क, सॅनिटायझर देण्यात आले. 

यावेळी सदर संस्थेच्या शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या सर्व बाबींचा पाठपुरावा करून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. 
यावेळी युवा नेते किरण गायकवाड, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पन्नालाल सुराणा, सचिव गुंडू पवार, व्यवस्थापक विलास वकील, गौसोद्दीन शेख, सदस्य, संदीप चौले, अधिक्षक, शिवसेना उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, जगन पाटील, सरदारसिंग ठाकूर, सोमनाथ म्हेत्रे उपशहरप्रमुख शिवसेना, शरद पवार, योगेश तपसाळे, आदी उपस्थित होते.
 
Top