तुळजापूर, दि. २९ : 

तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ११ हजार नागरिकांना लस  देण्यात आली आहे,  ज्याप्रमाणे लस उपलब्ध होत आहे, त्यानुसार लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे अशी माहिती उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शिरीष जाधव यांनी दिली.

शासनाच्या निर्देशाप्रमाणे लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे शासनाच्या सूचना जशा मिळतील आणि वयोगट आणि लस यांची उपलब्धता लक्षात घेऊन लसीकरण करण्यात येत आहे अशीही माहिती या निमित्ताने डॉ. शिरीष जाधव यांनी दिली.
 
Top