लोहारा ,दि.२९:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रभाग १६ मधील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मदत नव्हे कर्तव्य समजून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरीफा सय्यद यांच्या वतीने प्रभागातील नागरिकांना मास्क व सॅनिटायझर वाटप व जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे.
प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रभाग 16 मधील सर्व गल्लोगल्ली सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात आली .व कोरोनाच्या संसर्ग आजाराबाबत महिला नागरिकांतून जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या शरीफा सय्यद यांच्या वतीने प्रभागांमध्ये घराघरात सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले.
याप्रसंगी लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील साळुंके, महिला राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शरीफा सय्यद, माजी उपनगराध्यक्ष नाजमीन शेख,जालिंदर कोकणे, शहराध्यक्ष आयुब शेख,बहादूर मोमीन,निहाल मुजावर, माजी नगरसेवक गगन माळवदकर, नाना पाटील, हाजी बाबा शेख, निहाल मुजावर,वंदना भगत,पिंटू रसाळ,नवाज सय्यद, मिलिंद नागवंशी , हेमंत माळवदकर,स्वप्नील माटे, ताहेर पठाण,आदिसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सॅनिटायझर, मास्क वाटप व जंतुनाशक फवारणी प्रसंगी उपस्थित होते.