काटी, दि.२९: उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील धोत्री येथे शनिवार दि. 1 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शाळेच्या मैदानात क्रिकेट खेळणा-या मुलांच्या अंगावर वीज कोसळून मृत्यु झाला होता. पिढीत कुटूंबास ४ लाखाचे धनादेश सुपूर्द करण्यात आले आहे.
करण साईनाथ मस्के वय (12) या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला होता. वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या वारसाला 4 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या महसूल, मदत व पुनर्वसन विभागातर्फे घेण्यात आलेला असून त्याअनुषंगाने महसूल विभागाने तातडीने करण मस्के वय (12 ) या विद्यार्थ्याच्या मृत्यूची दखल घेत तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या सुचनेनुसार महसूल विभागाचे मंडळ अधिकारी शिंदे तलाठी अंकुश यांच्यामार्फत मयताचे आई व वडील साईनाथ मस्के यांच्याकडे 4 लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. कोरोना कालावधीत महसूल विभागामार्फत देण्यात आलेल्या आर्थिक मदतीमुळे मयतांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त करुन प्रशासनाचे आभार मानले.
यावेळी मंडळ अधिकारी शिंदे, तलाठी अंकुश , सरपंच अश्विनी साठे, येथील शांतीदुत तरुण मंडळाचे अध्यक्ष दत्ता उबाळे आदीजण उपस्थित होते.