नळदुर्ग, दि.१० :
अणदुर ता. तुळजापूर येथील सेवानिवृत्त शिक्षक रवींद्र विश्वनाथ करपे गुरुजी यांचे सोमवारी अल्पशा आजाराने वयाच्या ६५ व्या वर्षी रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे .
तुळजापूर तालक्यातील अणदुर जवाहर विद्यालयातून रविंद्र करपे गुरूजी सेवानिवृत्त झाले होते. शिक्षण प्रसारक मंडळ सेवकाची पतसंस्था मर्यादित अणदूरचे ते माजी सेक्रेटरी होते. ते विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. त्यांचे निधन झाल्याचे समजताच सोशल मिडीयावरून शिक्षक, विद्यार्थी व अणदुर येथील नागरिकांनी आदरांजली वाहिली.