उस्मानाबाद,दि.१०:
वाशी पोलिस ठाण्याच्या हाद्दीतील चोरीच्या गुन्ह्यातील चौघे आरोपी तर आनंदनगर पोलिस ठाण्याच्या हाद्दीत बेकायदेशीर जमाव जमवुन मारहाण केलेल्या गुन्ह्यातील दोघे ,असे सहा आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी तब्यात घेतले.
वाशी पोलिस ठाणे गु.र.क्र. 238/ 2019 भा.दं.सं. कलम- 379 या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी- 1)श्रीकांत बाबू काळे 2)बलभीम बाबू काळे 3)कल्याण शिवराम शिंदे 4)अनिल अंकुश शिंदे उर्फ राहुल, सर्व रा. टोकणी पारधी पिढी, ता. कळंब तर आनंदनगर पो.ठा. गु.र.क्र. 280 / 2020 भा.दं.सं. कलम- 143, 147, 149 या बेकायदेशी जमाव जमवून मारहाणीच्या गुन्ह्यातील आरोपी- 1)राधाबाई सुखदेव चव्हाण, वय 45 वर्षे 2)आकाश महादेव चव्हाण, वय 28 वर्षे, दोघे रा. साठेनगर, उस्मानाबाद हे सर्वजण पोलीसांना हवे होते. त्यांना स्था.गु.शा. चे सपोनि- श्री गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- श्री. मनोज निलंगेकर, पोउपनि- श्री. पांडुरंग माने, पोना- दिपक लाव्हरेपाटील, होळकर, संतोष गव्हाणे, हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- आरसेवाड यांच्या पथकाने आज दि. 10 मे रोजी टोकणी पारधी पिढी व उस्मानाबाद परिसरातून ताब्यात घेउन पुढील कार्यवाहिस्तव संबंधीत पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.