लोहारा, दि. १९ : 
 शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह व आय.टी.आय कोव्हीड सेंटर येथील सव्वा दोनशे रुग्ण व कर्मचाऱ्यांना  हाजी शब्बीर अहेमद अन्सारी बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शाकाहारी व मांसाहारी जेवण वाटप करण्यात आले.

 भोजन वाटपाच्या कार्यक्रमासाठी संस्थेला आथिर्क मदत उप तालुकाप्रमुख अमिन कुरेशी , सलिम कुरेशी, बाबा कुरेशी सामाजिक कार्यकर्ते महादेव धारूळे संस्थेचे अध्यक्ष महेबुब फकिर , प्रशांत काळे आदिनी आर्थिक मदत केले.

 हे जेवण वाटप करण्याचा हेतू मदत नसुन कर्तव्य म्हणून घेण्यात आले. रुग्णाची प्रकृती लवकर सुधरावी व रोगप्रतिकार शक्ती वाढावी व लवकर बरे व्हावे म्हणून  जेवण वाटप करण्यात आले.

 यावेळी डॉ.राजु गायकवाड ,  शिवसेना उप तालुकाप्रमुख शंकर लोभे,रफिक पठाण , हाजी आमिन सुंबेकर ,जाकेर करेशी, सादिक फकिर,असलम सय्यद, इरफान सय्यद,हानमंत भावजी, हमिद शेख, अमिर शेख, अफताब कुरेशी आदि उपस्थित होते,
 
Top