कळंब, दि. 06  
पालकमंत्री ना.शंकरराव गडाख-पाटील यांनी कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी ५ ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स मशीन उपलब्ध करून दिले आहेत. हे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स बुधवार रोजी  उपजिल्हा रुग्णालयाला तालुकाप्रमुख  शिवाजी  कापसे यांच्या हस्ते तहसीलदार रोहन शिंदे यांच्या उपस्थितीत सुपूर्द केल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे. 


कळंब तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उपजिल्हा रुग्णालय, कळंब याठिकाणी ऑक्सिजन बेडची वाढती मागणी लक्षात घेता पालकमंत्र्याकडे  या रुग्णालयासाठी ५ कॉंसंट्रेटर्स उपलब्ध करण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली होती.  त्याअनुषंगाने पालकमंत्र्यांनी पुर्तता केली आहे. 


या ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स मशिनमुळे ५ लिटर पेक्षा कमी प्रमाणात ऑक्सिजन लागणार असणाऱ्या रुग्णांना याचा फायदा होईल तसेच रुग्णालयातील इतर ऑक्सिजन बेड जास्त क्षमतेने ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांसाठी बेड उपलब्ध करण्यासाठी सोईस्कर होणार आहे.
याप्रसंगी शहरप्रमुख प्रदीप मेटे, रुग्ण कल्याण समितीचे सुशील तिर्थकर, हर्षद अंबुरे, नायब तहसीलदार असलम जमादार, प्रथमेश भुरके, डिकसळचे उपसरपंच सचिन काळे, भैय्या खंडागळे, पापाशेठ काटे, दिलीप पाटील तसेच वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.
 
Top