उस्मानाबाद,दि.६ :
जागजी ( ता, उस्मानाबाद) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने बुधवारी दि, ५ मे रोजी मोहतरवाडी गावात जावून नागरिकांची कोरोना रॅपिड अँटिजेंन चाचणी करण्यात आली. यावेळी 45 व्यक्तीची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये 3 व्यक्ती पाँझिटिव्ह निघाल्या आहेत.
यावेळी डॉ, निशा रोकडे, आरोग्य कर्मचारी श्री, एम, एस, नागलबोने, एस, एन, खुणे, व्ही, जी, लोहार, पोलिस पाटील सुभाष कदम , अंगणवाडी कार्यकर्ती खोत, आशा मुक्ता भोसले, सरपंच पती राम पांचाळ, उपसरपंच पांडुरंग आंधळे, सदस्य राजाभाऊ पाडुळे, पवन मळगे आदी उपस्थित होते,