तुळजापुर, दि.०२

लोककलेचा वारसा अनेक वर्ष चालविणारे ज्येष्ठ लोककलावंत दिलीप खंडेराय यांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे अशी मागणी मराठवाडा विकास परिषदेच्या वतीने  राज्य  सांस्कृतिक पुरस्कार निवड समिती मुंबई  अशासकीय सदस्य डॉ. सतीश महामुनी यांनी केली आहे.


एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मराठवाड्यातील सर्व कलावंतांच्या वतीने दिलीप खंडेराय यांचा यथोचित गौरव होण्यासाठी आणि लोककलेचा शासन दरबारी सन्मान होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र हा मानाचा पुरस्कार दिलीप खंडेराय या जाणत्या कलाकाराला देण्यात यावा अशी मागणी केली आहे. मराठवाडा विकास परिषदेच्या वतीने कोव्हीड आपत्ती नंतर सदर मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रितसर करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. 

महाराष्ट्राची लोककला पुढे घेऊन जाणाऱ्या वेगवेगळ्या लोक कलावंतांमध्ये दिलीप खंडेरायांचे स्थान आघाडीचे असून प्रदीर्घ काळ त्यांनी लोककलेची सेवा केली आहे .दर्जेदार लोककला आणि अभिजात वारसा त्याचबरोबर इतर लोक कलावंतांना देखील ते सोबत घेऊन सतत कार्यरत असतात. त्यांच्या कार्याची योगदान महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर खऱ्या अर्थाने मराठवाड्यातील या लोककलावंतास महाराष्ट्राच्या कला क्षेत्रामध्ये सन्मान प्राप्त होणार आहे.

 अशी भावना या निमित्ताने राज्य सरकारच्या पुरस्कार निवड समितीचे सदस्य डॉ. सतीश महामुनी यांनी व्यक्त केली आहे.
 
Top