खानापूर,दि.०३
मिञासमवेत क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या बालकाच्या अंगवार पावसात वीज पडुन दुर्दैवी मृत्यु झाला. ही घटना धोञी ता.तुळजापूर येथे शनिवार रोजी घडली.
तुळजापूर तालुक्यातील धोत्री येथे शनिवारी दि.१ रोजी मेघगर्जनेसह झालेल्या पवासामध्ये अंगावर वीज कोसळून इयत्ता ५ वी मध्ये शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
करण साईनाथ मस्के वय ११ वर्ष हा मित्रसमवेत क्रिकेट खेळण्यासाठी तो गेला होता. यादरम्यान अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.तेवढ्यात नियतीने घात केला आणि त्याच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये करणचा जागीच मृत्यू झाला.
करण हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता.करणच्या या आकस्मिक निधनाने त्यांच्या मातापित्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेची तामलवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक पंडित, पंचायत समिती सदस्य शिवाजी साठे, तलाठी अंकुश ,ग्रामसेवक भिमराव झाडे, पोलीस पाटील दत्ता पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. तामलवाडी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणुन नोंद झाली आहे.