उस्मानाबाद,दि.०३ : इकबाल मुल्ला

 जिल्ह्यात  रुग्णांची संख्या वाढत अअअअ आयसीयू उपचाराची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांची  वाढ होत आहे, तरी उपचारासाठी विशेषज्ञ व डॉक्टरांची नेमणूक करण्याची मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यानी  पत्राद्वारे  आरोग्य  मंत्री राजेश टोपे , वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक मंत्री अमित देशमुख यांना  केली आहे. 

ना.राजेश टोपे हे जिल्ह्याचे जावई तर ना.अमित देशमुख हे पूर्वाश्रमीचे उस्मानाबादकर असल्याची आठवण करून देते जिल्ह्यातील अत्यावस्थ रुग्णांसाठी तातडीने विशेषज्ञ व आरोग्य अधिकारी उपलब्ध करून द्यावेत.  उस्मानाबाद जिल्ह्यात देखील कोवीड - १९ महामारीने थैमान घातले आहे. ज्या गतीने रुग्ण संख्या वाढत आहे, त्या गतीने सुविधा निर्माण करणे शक्य होत नाही. मात्र तरीही या अडचणीच्या काळात सर्वतोपरी प्रयत्न करुन  जनतेला दिलासा देण्यासाठी मदत करत असल्याबद्दल दोघांचेही आभार मानत उस्मानाबाद मधील विदारक परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली.

 जिल्ह्यात करोना बाधित उपचाराधीन रुग्णांची संख्या ६८७८ असून दुर्दैवाने ९०३ मृत्यू झाले आहेत. देशाची किंवा राज्याची सरासरी बघता उस्मानाबादचा मृत्यूचा दर अत्यंत चिंताजनक आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात ४०० पेक्षा जास्त ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णावर उपचार सुरु असून आयसीयू मध्ये ६० बेड आहेत व हे वाढविण्याची प्रक्रिया चालू आहे. रुग्णांना ऑक्सिजन जोडणी खाटा व रेमडिसीवीर सहजा सहजी उपलब्ध होत नाहीत. जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य सेवा देण्यासाठी निकषाप्रमाणे १२ भीषक लागतात. परंतु केवळ ४ उपलब्ध आहेत, भूलतज्ञ ६ च्या ठिकाणी २ व आरोग्य अधिकारी १० च्या ठिकाणी २ अशी सध्या चिंताजनक परिस्थिती आहे. 

मार्च २०२० पासून आ.पाटील हे उस्मानाबादला विशेषज्ञ देण्याबाबत विनंती करीत आहेत. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर काहींचे बदली आदेश काढले होते, परंतू केवळ दोनच डॉक्टर रुजू झाले आहेत. 

पदवी व पदव्युत्तरचे अंतिम वर्षातील विद्यार्थी व बंधपत्र निकषा प्रमाणे सेवा करत असलेले डॉक्टर्स यांना विविध जिल्ह्यात कामाची जबाबदारी दिली असून अशा ७०० डॉक्टरांपैकी केवळ दोघांची नियुक्ती उस्मानाबाद जिल्ह्यात करण्यात आली आहे. हे अन्यायकारक असल्याचे आमदार पाटील यानी म्हटले आहे.

 
Top