उस्मानाबाद  , दि.०३
तालुक्यातील तुगांव (ढोकी ) येथे कोरोनाचा प्रादुर्भाव  वाढत असल्याचे पाहुन  उपाय योजना म्हणुन कोरोना चाचणी व मास्कचे वाटप करण्यात आले.

 गेल्या आठवड्यात  तुगांव ग्रामपंचायत च्यावतीने पँनेल प्रमुख  लालासाहेब शेंडगे यानी जिल्हा  वैद्यकीय  अधिकारी यांच्या समवेत गावात वाढत चालेल्या रूग्णाची संख्या यावर नियंत्रणासाठी  गावात रॅपीड अँन्टीजन टेस्ट करण्यासाठी कॅम्प लावण्याची मागणी  केली.


 तीन दिवसात वैद्यकीय  सेवेतील कर्मचाऱ्यानी १७५ टेस्ट करून घेतल्या.  कोरोन महामारीवर उपाय म्हणुन व ग्रामपंचायतला मदत म्हणुन   डॉ. संतोष पाटील यांनी  शंभर नग एन ९५ मास्क  लालासाहेब शेंडगे , किशोर शेंडगे यांच्याकडे सुपुर्द केले, कोरोना वारियरला वाटप  करुन उर्वरीत मास्क सर्व सामान्य जनतेला वाटप करण्यात  आले, 

याप्रसंगी उपस्थित  डॉ. संतोष पाटील ,  निशिकांत पाटील , बालाजी शेंडगे , सुशील गडकर , दत्ता भुतेकर , गणेश शेंडगे , प्रशांत शेंडगे,  पद्माकर सुरवसे आदीसह  कोरोना वारीयर उपस्थित होते.
 
Top