उस्मानाबाद, दि.२९ : 

स्थानिक गुन्हे शाखा: विजय शिवाजी भुतेकर, रा. खामसवाडी, ता. कळंब यांची होंडा ड्रिम युगा मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एए 7292 ही दि. 04- 05.03.2021 दरम्यानच्या रात्री गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली होती. यावर कळंब पो.ठा. येथे गु.र.क्र. 185 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 379 नुसार दाखल आहे.

                        गुन्हा तपासा दरम्यान स्था.गु.शा. चे पोनि- श्री गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- बबन जाधवर, अविनाश मरलापल्ले, माने यांच्या पथकास मिळालेल्या गोपनीय खबरेवरुन बिच्छया पारधी पिढी, कोठाळवाडी, ता. कळंब येथील शिवाजी नामदेव काळे उर्फ मखल याच्या ताब्यातून दि. 28.05.2021 रोजी नमूद चोरीची मोटारसायकल जप्त करुन पुढील कार्यवाहिस्तव शिवाजी काळे यास कळंब पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे

 
Top