उस्मानाबाद जिल्हा: काल बुधवार दि. 05.05.2021 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांच्या आदेशावरुन अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम करण्यात आली. या मोहिमेदरम्यान 21 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात आढळलेली 192 लि. गावठी दारु, शिंदी- 40 लि. व देशी- विदेशी दारुच्या 152 बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त मद्यार्काची एकत्रीत किंमत 29,286 ₹ आहे. यावरुन 21 व्यक्तींविरुध्द म.दा.का. अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 21 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लोहारा: सीमा चव्हाण, रा. ढोकी तांडा, ता. लोहारा हे आपल्या राहत्या घरासमोर दोन कॅनमध्ये 20 लि. गावठी दारु (किं.अं. 2,000 ₹) अवैधपणे बाळगलेल्या आढळल्या.
योगेश जाधव, रा. हिप्परगा (रवा), ता. लोहारा हे आपल्या पत्रा शेडमागे देशी दारुच्या 16 बाटल्या (किं.अं. 960 ₹) अवैधपणे बाळगलेले आढळले.
उमरगा: बालाजी दुधभाते, रा. तुरोरी, ता. उमरगा हे नारंगवाडी शिवारातील एका शेतात विदेशी दारुच्या 47 बाटल्या (किं.अं. 7,300 ₹) अवैधपणे बाळगलेले आढळले.
निवृत्ती बरकंबे, रा. कोळीवाडा, उमरगा हे उमरगा येथे दोन कॅनमध्ये 10 लि. शिंदी (किं.अं. 700 ₹) अवैधपणे बाळगलेले आढळले.
शिवलींग स्वामी, रा. गुंजोटी हे गावातील मनोरंजन पार्कसमोर 9 लि. गावठी दारु (किं.अं. 850 ₹) अवैधपणे बाळगलेले आढळले.
रामदास सुर्यवंशी, तुरोरी हे गावातील भ्रमणध्वनी मनोऱ्याजवळ 20 लि. गावठी दारु (किं.अं. 1,700 ₹) अवैधपणे बाळगलेले आढळले.
वाशी: सुब्राव काळे, रा. पारा, ता. वाशी हे आपल्या राहत्या घरासमोर एका कॅनमध्ये 8 लि. गावठी दारु (किं.अं. 610 ₹) अवैधपणे बाळगलेले आढळले.
तुळजापूर: मिनाबाई शिंदे, रा. कसई पाटी या आपल्या राहत्या घरासमोर दोन कॅनमध्ये 30 लि. गावठी दारु (किं.अं. 1,800 ₹) अवैधपणे बाळगलेल्या आढळल्या.
उस्मानाबाद (ग्रा.): लता पवार, रा. येडशी, ता. उस्मानाबाद या आपल्या राहत्या घरासमोर दोन कॅनमध्ये 10 लि. गावठी दारु (किं.अं. 600 ₹) अवैधपणे बाळगलेल्या आढळल्या.
आण्णा मचाले, रा. भानसगांव, ता. उस्मानाबाद हे आपल्या शेतात रबरी नळीमध्ये 40 लि. गावठी दारु (किं.अं. 2,400 ₹) अवैधपणे बाळगलेले आढळले
सुशिला काळे, रा. शिंदेवाडी, ता. उस्मानाबाद या आपल्या राहत्या घरासमोर एका कॅनमध्ये 16 लि. गावठी दारु (किं.अं. 980 ₹) अवैधपणे बाळगलेल्या आढळल्या
येरमाळा: संतोष कवडे, रा. बावी, ता. वाशी हे गावातील बसस्थानक येथे देशी दारुच्या 10 बाटल्या (किं.अं. 520 ₹) अवैधपणे बाळगलेले आढळले.
संतोष पवार, रा. येरमाळा हे येरमाळा येथील चिकन दुकानाच्या बाजूस देशी दारुच्या 9 बाटल्या (किं.अं. 518 ₹) अवैधपणे बाळगलेले आढळले.
भुम: सुभाष काळे, रा. उळुप पाटी, ता. भुम हे बऱ्हानपुर शिवारातील रस्त्यालगत एका कॅनमध्ये 10 लि. गावठी दारु (किं.अं. 1,020 ₹) अवैधपणे बाळगलेले आढळले.
शाम खोसे, रा. वालवड, ता. भुम हे चुंबळी रस्त्यालगत देशी दारुच्या 12 बाटल्या (किं.अं. 960 ₹) अवैधपणे बाळगलेले आढळले व पोलीसांची चाहुल लागताच घटनास्थळी मद्य सोडून पळाले.
कळंब: प्रदीप कुरळे, रा. बाबनगर, कळंब हे शहरातील कल्पनानगर येथे 30 लि. शिंदी (किं.अं. 900 ₹) अवैधपणे बाळगलेले आढळले.
तोलाबाई पवार, रा. शेळी बाजार, कळंब या राहत्या गल्लीत एका कॅनमध्ये 10 लि. गावठी दारु (किं.अं. 500 ₹) अवैधपणे बाळगलेल्या आढळल्या.
सुरवंता काळे, रा. वाकडी (केज), ता. कळंब या गाव शिवारात 10 लि. गावठी दारु (किं.अं. 500 ₹) अवैधपणे बाळगलेल्या आढळल्या.
मुरुम: विक्रम पवार, रा. चौगुले वस्ती, लमाण तांडा, तुगाव हे राहत्या वस्तीवर एका घागरीत 9 लि. गावठी दारु (किं.अं. 980 ₹) अवैधपणे बाळगलेले आढळले.
आंबी: संतोष शिंदे, रा. आनाळा हे गावातील प्रकाश ढाब्याजवळ देशी दारुच्या 48 बाटल्या (किं.अं. 2,496 ₹) अवैधपणे बाळगलेले आढळले.
तामलवाडी: नंदकुमार चौरे, रा. तामलवाडी हे राजमुद्रा ढाब्यामागे विदेशी दारुच्या 10 बाटल्या (किं.अं. 992 ₹) अवैधपणे बाळगलेले आढळले.