वाशी, दि. ६ 
मारहाण करून कायदयाचे उल्लंघन केल्याबद्दल  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी चौघांना प्रत्येकी दोन वर्ष सश्रम कारावासासह अर्थिक दंडाची शिक्षा सुनावली. 


 मारहाण केल्या प्रकरणी वाशी पोलिस ठाणे  येथे दाखल असलेल्या गु.र.क्र. 53 /2015 या गुन्ह्याची सुनावनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वाशी यांच्या न्यायालयात होउन काल दि. 05 मे रोजी निकाल जाहिर झाला. यात विकास कोंडीबा थोरबोले, अश्रुबा तात्याबा थोरबोले , रेखा आश्रुबा थोरबोले , दत्तात्रय कोंडीबा थोरबोले, सर्व रा. गोजवाडा, ता. वाशी यांना भा.दं.सं. कलम- 326 च्या उल्लंघनाबद्दल प्रत्येकी 2 वर्षे सश्रम कारावासासह 1,000  दंडाची शिक्षा तर भा.दं.सं. कलम- 324 च्या उल्लंघनाबाद्दल प्रत्येकी 2 वर्षे सश्रम कारावासासह 200  दंडाची शिक्षा सुनावन्यात आली.
 
Top