तुळजापूर,दि.६:                       
  नगराध्यक्ष सचिन  रोचकरी यांच्या वाढदिवसानिमित्त  शहरातील विविध ठिकाणे जंतु नाशक फवाणी, वृक्षारोपन, मेडीकल किट,किराणा किट, नविन पाणी टाकीचे लोकार्पन, लाईट हायमस्ट,नगर परिषद कर्मचार्‍यांना प्रोत्सानपर मदतीचा हात,अपंग लोकांना अनुदान वाटप,कोरोना पेशंटला पुलाव राईस नाष्टा आदी   उपक्रम वाराबविण्यात आले. 
  
 सकाळी  १२४ कोवीड सेंटर येथे ३०० कोरोना रुग्णांना आल्पोपहार फुलावा राईस वाटप करण्यत आले.
 प्रभाग क्रमांक ८ पूर्व मंगळवार पेठ मध्ये नगराध्यक्ष रोचकरी यांनी स्वखर्चातून  जंतुनाशक फवारणी  तसेच संबंधित प्रभागामध्ये मेडिकल किट वाटप करण्यात आले, कोरोना जनजागृती पञक, मास्क, सॅनिटायझर, अरसोनिक अल्बमच्या गोळ्या वाटप करण्यात आल्या. 

 प्रभागा क्र ८ मध्ये कोरोना   जनजागृती बाबतचे फलक लावण्यात आले. कै. वनमला अशोक जाधव यांच्या स्मरणार्थ सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले.
 दुपारी नगरपरिषद येथील कोरोना काळात अंत्यविधी करणारे १० कर्मचारी व फवारणी करणारे ०४ कर्मचारी यांना माणुसकीच्या नात्याने नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी स्वखर्चातुन प्रत्येकी २०००/- रुपयाचे  प्रोत्साहनपर पारितोषिक  देण्यात आले. तसेच अपंग लोकांना नगरपरिषदेच्या माध्यमातुन ३८ अपंगाना प्रत्येकी  सहा हजार रुपये देण्यात आले. 

 तुळजापूर खुर्द येथे शिवरत्न नगर येथे पाणी बोअर व पाणी टाकीचे उदघाटन करण्यात आले. सामाजीकार्यकर्ता दिपक पलंगे मित्र परीवाराच्या वतीने ४१ झाडांचे वृक्षा रोपन करण्यात आले
दुपारी   रमजान सनानिमीत्त ९० मुस्लिम बांधवांंना, कुटुंबाना बिर्याणी पॉकेट वाटप करण्यत आले तसेच
  प्रभाग क्र ८ पूर्व मंगळवार पेठ येथे विविध  ५ ठिकाणी लाईट हायमस्ट  बसविण्यात आले.  दिपक चौक ,जवाहर चौक,रावळ गल्ली चौक,कमानवेस चौक ,एस बी आय बँक शेजारी मंगळवार पेठ येथे  पाच ठिकाणी लाईट हायमस्ट बसविण्यत आले. तसेच सायंकाळी शहाजी भांजी व नानासाहेब डोंगरे यांच्यावतीने प्रभाग क्र ८ मध्ये गरजु लोकांना किराना किटचे वाटप करण्यात आले. 
वरील सर्व समाज उपयोगी कार्यक्रम हे  कोरानोच्या अनुषंगाने  नियमाचे पालन  करुन विविध ठिकाणी साजरा करण्यात आले.      
 वरील  कार्यक्रमाचे  उदघाटन  ठिकाणी  युवा नेते विनोद  गंगणे, नगरसेवक अमर मगर,पंडीत जगदाळे, विशाल रोचकरी,औदुंबर कदम, तानाजी कदम, माऊली भोसले, किशोर साठे,विनोद पलंगे,नानासाहेब लोंढै,अभिजीत कदम,अंबरीश जाधव,आदी  उपस्थित होते.
 तसेच समाज सेवक नानासाहेब डोंगरे,प्रकाश  मगर,आनंद कंदले,भरत सोनवणे,योगेश रोचकरी,श्रीनाथ शिंदे,हणमंत पुजारी,विनोद नेपते,भालंचद्र मगर,दिलीप मामा सोमवणे,श्रीकांत धुमाळ,आण्णा मगर,नागेश अंबुलगे,महेश अंबुलगे,सागर कंगले,गुंडु कदम,कालीदास चिवचिवे,चंक्रांत लोंढे,भऊ भांजी,संजय जाधव  ,जनक पाटील आदीसह नागरीक उपस्थित होते. 

 नगरपरिषद मधील कार्यक्रमास नगर परिषदचे मुख्याधिकारी,सर्व अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. 


 
Top