नळदुर्ग, दि. 06 
बहीनीस माहेरी घेउन जाण्याच्या कारणावरून एकाच्या अंगावर चारचाकी वाहन घालून खुन करण्यात आल्याची घटना मानेवाडी ता. तुळजापूर येथे बुधवार दि. 05 मे रोजी  दुपारी साडेतीन वाजता घडली. 


रमेश हाके याने पिकअप वाहन क्र. एम.एच. 13 एएन 4239 हा भाऊजी- सिद्राम बर्वे यांच्या अंगावरुन चालवून त्यांचा खून केला. अशा मजकुराच्या मयताचे पिता- वसंतराव रावसाहेब बर्वे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तीन जणाविरुध्द खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.

सिद्राम उ र्फ सिधू वसंतराव बर्वे वय 32 वर्ष रा. मानेवाडी असे खुन झालेल्याचे नाव आहे. रमेश तुकाराम हाके, तुकाराम हाके, भाऊराव उ र्फ दादा हाके सर्व रा. मानेवाडी ता. तुळजापूर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.  
वसंतराव बर्वे यांच्या फिर्यादीनुसार
सिद्राम उर्फ सिधू वय 32 वर्ष याचे लग्न 8 वर्षापूर्वी बालीका तुकाराम हाके हिचे सोबत झाले असून त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. मी व माझे कुटूंबीय आमच्या शेतात राहतो. मुलगा सिद्राम उर्फ सिधू हा ट्रॅक्टर चालवतो व शेती व्यवसाय करतो. सिद्राम  उर्फ सिधू व सून बालीका यांच्यात नेहमी घरघूती कारणामुळे किरकोळ वाद होत होते. यापूर्वी यांच्यात झालेल्या वादावरुन दोन तीन वेळा बालीका हिला तिच्या आई वडील व भाऊ माहेरी घेऊन गेले होते. आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढून नांदविण्यासाठी आणलेले आहे. 


बुधवार दि. 5 नोव्हेंबर रोजी माझी सून बालीका व मुलगा सिधू यांच्यात किरकोळ घरघुती कारणावरुन वाद झाला होता. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास माझी सून बालीका हिचा भाऊ रमेश हाके त्याचे‍ वडिल तुकाराम हाके त्याचा भाऊ भाऊराव हाके असे त्यांची पिकअप गाडी क्रमांक एम. एच. 13 ए. एन 4239 घेऊन शेतातील घरी आले.


 दुपारी सव्वा तिन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान माझी सून बालीका हिला घेऊन परत त्याच्या घरी निघाले. त्यांना समजवून सांगणेकरीता घरच्या  अलीकडे शेताच्या रस्त्यावर मी स्वत: सोबत माझा मुलगा‍ सिधू माझा मेव्हाणा नरहरी गडदे , मामाचा मुलगा राम भागवत माने आमचे शेत शेजारी रंगणात सुभाष हाके असे थांबलो होतो. त्यांनी गाडी थांबवावी म्हणून माझा मुलगा सिधू याने रस्त्यामध्ये दगड टाकले होते. 

आमच्या घराकडुन गाडी वेगात येताच आम्ही त्यांना हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला.  परंतु गाडी चालक रमेश तुकाराम हाके सोबत त्याचे वडील तुकाराम व त्याचा भाऊ भाऊराव हाके यांनी संगणमत करुन बालीका हिस माझा मुलगा त्रास देतो या कारणावरुन जिवे मारण्याच्या उद्देशाने माझा मुलगा सिधु यास जोराची धडक देऊन त्याच्या अंगावर पिकअप वाहन घालून न थांबता वेगाने निघून गेले. 


 त्यामुळे माझा मुलगा सिद्राम याचे डोक्यास, कपाळावर गंभीर जखम होऊन तो बेशुद्ध झाला. नाका तोंडातून रक्त आले व त्याची हालचाल बंद झाली. त्यानंतर सिद्राम यास सरकारी दवाखाना जळकोट ता. तुळजापूर  येथे घेऊन गेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी नळदुर्ग पोलिसात वसंतराव रावसाहेब बर्वे यांनी फिर्याद दिल्यावरून  तिघा आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
Top