उस्मानाबाद, दि. 06 : उस्मानाबाद जिल्हयात आज गुरुवार दि. 06 मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 813 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 24 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 729 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 42 हजार 697 इतकी झाली आहे. यातील 34 हजार 449 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 हजार 5 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 7 हजार 252 जणांवर उपचार सुरु आहेत.